काँग्रेसचे माजी नेते नितीन कोडवते यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्रात काँग्रेसला एकापाठोपाठ एक मोठा फटका बसत आहे. आज मुंबईत काँग्रेस नेते डॉ.नितीन कोडवते यांनी पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

0
WhatsApp Group

काँग्रेसचे माजी नेते नितीन कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसचे माजी नेते नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नितीन कोडवते हे नक्षलग्रस्त गडचिरोलीतील प्रसिद्ध नाव आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. या दोघांचे भाजप कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये स्वागत केले.

हेही वाचा – अटकेनंतर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार का? कायदा काय म्हणतो?