Skin Care Tips: सध्या राज्यासह देशभरात उष्णतेची लाट आल्यानं लोक हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळं त्वचेची लाहीलाही होत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्वचेवर आणि चेहऱ्यावर होत आहे. त्यामुळं या काळात त्वचेची आणि चेहऱ्याची फार काळजी घेणं आवश्यक असतं. कारण उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेचा सर्वात जास्त प्रभाव हा चेहऱ्यावर आणि त्वचेवर होत असतो. या उष्ण वातावरणात चेहऱ्यावरील पुरळ आणि सूर्यकिरणांमुळे मेलेनिनचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळं त्वचा आणि चेहरा काळा पडू लागतो. त्यासाठी स्किन केयर रुटीनमध्ये बदल करण्याची आवश्यकता असते. त्यामुळं वाढलेल्या उन्हाळ्यात त्वचेची कशी आणि कोणती काळजी घ्यायला हवी, याबद्दल जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर तेलकटपणा येऊन त्वचा काळी व्हायला लागते. त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा फेसवॉश वापरायला हवा. त्याचबरोबर डीप क्लीनसाठी एक्सफोलिएशनला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा आणि नॉन स्टिकी मॉइस्चरायझर असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर करणंदेखील फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर वाढलेल्या उष्णतेपासून चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेस मास्कचाही वापर करायला हवं.
हेही वाचा – Skin Care Tips: चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरीच बनवा हा फेस पॅक, फॉलो करा या टिप्स
त्याचबरोबर चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहल फ्री, जेलबेस क्लीन्जरचा वापर करणं गुणकारी ठरतं. त्वचा आणि चेहरा कोरडा ठेवण्यासाठी मॉइस्चरायझिंग क्रिम आणि उष्णतेपासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी हायड्रेटेड मिल्क लोशनचा वापर करायला हवा. त्यामुळं उन्हाचा काहीही परिणाम तुमच्या चेहऱ्यावर न होता त्यामुळं तुमची त्वचा आणि चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड असणं फार गरजेचं असतं. त्यासाठी रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर अॅडिशनल हायड्रेशनसाठी हायड्रेटिंग फेस क्रीमचा उपयोग करायला हवा. त्याचबरोबर चेहऱ्याचं आरोग्य राखण्यासाठी त्वचेला व्हिटॅमिन सी ची फार आवश्यकता असते. त्यासाठी व्हिटॅमिन सी च्या सीरमचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यासाठी नारळपाणी, टरबूज आणि फ्रेश ज्युस पिणं हे अत्यंत फायदेशीर ठरत असतं.
हेही वाचा – Health Tips: ‘या’ 9 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका, या समस्या उद्भवू शकतात