Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. गुरुवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार झाला, त्यात चार जवान शहीद झाले तरदोन जवान जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी हल्ले राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दोन लष्करी वाहनांवर झाले. पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट तहसीलमधील बाफलियाज पोलीस स्टेशन मंडी रोडकडे जाणाऱ्या लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला.
Army Truck Ambushed By Terrorists In Jammu And Kashmir’s Poonch District
J&K Poonch ambush: Reports said reinforcements have been sent to the area where the ambush happened. Firing has been going on, reports said. pic.twitter.com/HnNFA9QUhL— josh kumar (@joshkum18719270) December 21, 2023
वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने रचला इतिहास, पहिल्यांदाच घडलं असं काही
जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवादी घात घालून हल्ले करत आहेत. शोध मोहिमेदरम्यान परवेझ अहमद उर्फ हरिस या दहशतवाद्याला अटक करण्यात किश्तवाड पोलिसांना यश आले आहे. भारतीय पोलीस गेल्या 18 वर्षांपासून या दहशतवाद्याचा शोध घेत होते.
#WATCH | Security heightened at the Jammu-Rajouri-Poonch highway after the terrorist attack on two military vehicles in the Thanamandi area in the Rajouri sector. https://t.co/tpArIiVtYi pic.twitter.com/uBkM3V3byZ
— ANI (@ANI) December 21, 2023
J&K | One more Army personnel succumbed to injuries. The death toll in the terrorist attack on two military vehicles in the Thanamandi area in the Rajouri sector is four now: Army Officials https://t.co/tpArIiVtYi
— ANI (@ANI) December 21, 2023
हल्ला कुठे झाला?
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-राजौरी-पुंछ महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. बुधवारी (20 डिसेंबर) सायंकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील संयुक्त मोहिमेला सैनिक बळकट करणार होते. 48 राष्ट्रीय रायफल्स परिसरात ही कारवाई सुरू आहे.