Sanju Samson: वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने रचला इतिहास, पहिल्यांदाच घडलं असं काही

WhatsApp Group

Sanju Samson: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. संजूने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. शतक झळकावल्यानंतर त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा संजू हा केरळ राज्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.

संजू सॅमसनने डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी सुरू ठेवली. त्याला तिलक वर्माने चांगली साथ दिली. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक आहे. त्याने 110 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 114 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 108 धावा केल्या. संजूची गणना सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला रोखणे कठीण होऊन बसते.

संजू सॅमसनने 2021 मध्ये भारताकडून पदार्पण केले. खराब फॉर्ममुळे त्याला संधी मिळत नव्हती. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याने भारतासाठी 16 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. , ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. युवा सलामीवीर साई सुदर्शन अवघ्या 10 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदारलाही 22 धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुलने 21 धावांचे योगदान दिले. मात्र संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. संजूने 108 तर टिळकने 52 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने झटपट 38 धावा केल्या.