”ज्याने शिकवलं त्याच्याच पाठीत वार केलास”, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते संतापले

WhatsApp Group

Mumbai Indians: फ्रँचायझीने शुक्रवारी अचानक मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर चाहते चांगलेच संतापलेले दिसले. हिटमॅनची फॅन ब्रिगेड सोशल मीडियावर पूर्णपणे संपात व्यक्त करत आहेत. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनी फ्रँचायझीविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. कोणी मुंबईचा झेंडा जाळला तर कोणी समर्थन बंद करण्याबाबत बोलत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

चाहते प्रचंड संतापले

गेल्या 10 वर्षात मुंबई इंडियन्सला आपल्या कर्णधारपदाखाली 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला अचानक कर्णधारपद गमवावे लागेल असे वाटले नसेल. हार्दिक पांड्याला रिलीझ-रिटेन्शननंतर फ्रँचायझीने त्याच्या संघात परत बोलावले होते. आता त्याच्याकडे अचानक कर्णधारपद सोपवण्यात आले. यामुळे फ्रेंचायझीचे समर्थक आणि रोहित शर्मा दोघेही संतप्त झाले. एका चाहत्याने फ्रँचायझीचा झेंडा आणि जर्सी जाळतानाचा फोटो शेअर करण्यास सुरुवात केली, तर एकाने तर आजपासून मी मुंबई इंडियन्सचा समर्थक नाही, असे सांगितले. अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विदेशी अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते गोंधळले, म्हणाले – प्रिती झिंटा आहे…

काही चाहते हार्दिक पांड्याला लक्ष्य करत आहेत. मीम्सच्या दुनियेत हार्दिकला कट्टप्पा ही पदवी देखील मिळाली आहे. ज्याने शिकवले त्याच्या पाठीत त्याने वार केला असे लोक म्हणत आहेत. हे मीम्समध्ये व्हायरल होत आहे. मात्र अद्याप रोहित शर्मा किंवा मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोशल मीडियावर युद्धासारखे वातावरण निर्माण झाले आहे. रोहितचे चाहते संतापले आहेत. इंस्टाग्राम आणि ट्विटरवरही लोकांनी मुंबई इंडियन्सला अनफॉलो करायला सुरुवात केली आहे.

रोहित शर्मा सर्वात यशस्वी कर्णधार 

रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सची कमान सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने 2013, 15, 17, 19 आणि 20 मध्ये विजेतेपद पटकावले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने एकूण 163 सामने खेळले. त्यापैकी 91 मध्ये संघ जिंकला आणि 68 गमावला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरला. आता 11 वर्षांनंतर फ्रँचायझीला IPL 2024 मध्ये हार्दिकच्या रूपाने नवा कर्णधार मिळणार आहे. हार्दिक हा मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील 9वा कर्णधार असेल.

हार्दिकची आयपीएल कारकीर्द 

हार्दिकची आयपीएल कारकीर्द चांगलीच राहिली आहे. त्याने आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 115 डावांमध्ये 30.38 च्या सरासरीने 2,309 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 145.86 आहे. या काळात त्याने 10 अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 91 धावा होती. गोलंदाजीत या खेळाडूने 33.26 च्या सरासरीने आणि 8.8 च्या इकॉनॉमी रेटने 53 बळी घेतले आहेत. 17 धावा देत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुंबईसाठी हार्दिकची कामगिरी

हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि फ्रँचायझीसाठी सलग सात हंगाम खेळले. या काळात हार्दिकला 92 सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने 85 डावात फलंदाजी केली आणि 27.33 च्या सरासरीने 1476 धावा केल्या. हार्दिकच्या बॅटमधून चार अर्धशतकांच्या खेळीही पाहायला मिळाल्या. मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकने ९१ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक पांड्याने 92 सामन्यात 31.26 च्या सरासरीने 42 बळी घेतले आहेत, ज्यामध्ये 20 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक जेव्हा मुंबई इंडियन्सचा भाग होता तेव्हा संघाने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.