पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात 4 जणांची केली हत्या

WhatsApp Group

एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चार जणांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावया यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी जावयाला अटक केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास यवतमाळ पोलीस करत आहेत. Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण, 8 रुग्ण एकट्या मुंबईत

हा सर्व प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील तिरझाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी गोविंद वीरचंद पवार याला अटक केली आहे. पारधी बेडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. पत्नीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपी गोविंद वीरचंद पवार याने चौघांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडलं 

या हत्याकांडात सासरे पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला आहे. गोविंद पवार यांची सासू रुखमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपींनी चौघांवर धारदार शस्त्राने वार केले. कळंबा पोलिसांनी आरोपी जावई गोविंद वीरचंद पवार याला अटक केली आहे. Kangana Ranaut: बॉलीवूड क्वीन कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार