IPL 2024 CSK Captain Change: IPL 2024 च्या आधी चेन्नई सुपर किंग्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नईने माजी भारतीय फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. धोनी आयपीएल 2024 मध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. आता चेन्नईचा स्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाड याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गायकवाड आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतात. जिथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या फोटोमध्ये दिसला नाही. त्याच्या जागी संघाचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडला पाठवण्यात आले. गायकवाड या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे आता सीएसकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – IPL 2024 Live Streaming: आयपीएलचे सामने मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
ऋतुराज गायकवाडने 2019 मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 52 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने 1797 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे चेन्नईकडून खेळताना त्याने शतकी खेळीही खेळली आहे.
𝐈𝐭’𝐬 𝐒𝐡𝐨𝐰𝐓𝐢𝐦𝐞!
The #TATAIPL is here and WE are ready to ROCK & ROLL 🎉🥳🥁
Presenting the 9 captains with PBKS being represented by vice-captain Jitesh Sharma. pic.twitter.com/v3fyo95cWI
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024
ऋतुराज गायकवाड चौथा कर्णधार ठरला
ऋतुराज गायकवाड त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. याच कारणामुळे सीएसकेने गायकवाड याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ऋतुराज सीएसकेचा चौथा कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी स्टार खेळाडू सुरेश रैना आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनीही चेन्नईचे नेतृत्व केले आहे. अशा स्थितीत गायकवाड याच्यावर एवढा मोठा सट्टा खेळणे चेन्नईला कितपत फायदेशीर ठरते, हे पाहावे लागेल.
हेही वाचा – क्रिकेट विश्वात शोककळा! माजी कर्णधाराने घेतला जगाचा निरोप
22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. या मोसमातील स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नईतील चेपॉक येथे हा सामना होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. एमएस धोनीच्या चाहत्यांनाही आयपीएल 2024 बद्दल खूप उत्सुकता होती, पण टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.