”अघोरी राजकारण वठणीवर आणा…” लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

WhatsApp Group

मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आता राज ठाकरे यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी ही पोस्ट केली.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे? वाचा सर्व माहिती

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा. असं राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी मोठा आरोप केला. संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाना साधला आहे. संजय राऊत हे म्हणाले की, निवडणूक आयोगाचे दबावाखाली काम सुरू आहे. देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. आता निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या म्हटले की, आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे सुरूच राहणार आहे.

हेही वाचा – WPL 2024 चा फायनल सामना किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या…