रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक; पहा व्हिडिओ

WhatsApp Group

चैत्र शुद्ध नवमीचा दिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो. मध्यान्ही जन्मलेल्या श्रीरामावर सूर्य अभिषेक झाला होता अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आज रामनवमीच्या दिवशी दुपारी 5 मिनिटे सूर्यकिरण अभिषेक करण्यात आला. हा अद्भुत क्षण पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

राम मंदिरात सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. रामनवमी उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केली आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या महानगरपालिका राम मंदिरात रामनवमी उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी अयोध्याभर सुमारे 100 एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या होत्या, ज्यावर भाविकांनी रामनवमी उत्सव थेट पाहिला. याशिवाय यूट्यूबसह ट्रस्टच्या एक्स अकाउंटवरही थेट प्रक्षेपण करण्यात आले.

पहा व्हिडिओ 

हेही वाचा  – Rain in Dubai : दुबईत पावसाचे थैमान, एका दिवसाच्या पावसात आला पूर; विमानतळ-स्टेशन सर्व बंद