Rain in Dubai : दुबईत पावसाचे थैमान, एका दिवसाच्या पावसात आला पूर; विमानतळ-स्टेशन सर्व बंद

0
WhatsApp Group

Rain in Dubai: मुसळधार पावसामुळे दुबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. उड्डाणांवर परिणाम झाला आहे. विमानतळापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पाणी आहे. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्या जवळपास पाण्यात बुडाल्या आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB) हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. हवामानामुळे येथे व्यत्यय आला आहे. पाण्याने भरलेल्या रस्त्यावर विमाने चालवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी विमानतळावरील वाहतूक 25 मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती. देशातील असामान्य हवामानामुळे शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्सवरही परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वसामुळे येथे मोठी पूरस्थिती निर्माण झाली असून दुबई प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पाण्यात कार तरंगत असताना दिसत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.