गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करणी सेनेने केला आहे. करणी सेनेचे नेते राज शेखावत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ते म्हणतात की, जो पोलिस लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करेल. त्याला बक्षीस म्हणून 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये देणार आहेत. त्या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आपली जबाबदारी असेल. लॉरेन्सचा सामना करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पूर्ण पाठिंबा देईल, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत
तुरुंगात बसून तो लोकांची हत्या करत आहे. लोकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे. केंद्र सरकार या गोष्टी का लपवत आहे? एका गुंडामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 22 डिसेंबरला अहमदाबादमध्ये क्षत्रिय एकता महासंमेलन होणार आहे. याबाबत क्षत्रिय समाजाच्या जाहीर सभा होत आहेत. राज शेखावत एक दिवस आधी झालेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठीच वडोदरा येथे पोहोचले होते. आता त्याचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.