SA vs AUS: सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आफ्रिकेला मोठा धक्का, या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

स्टार खेळाडूची वनडे कारकीर्द संपुष्टात आली आहे. हा खेळाडू आता फक्त टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या देशासाठी खेळताना दिसणार आहे.

0
WhatsApp Group

ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यांसोबतच एका स्टार खेळाडूचे वनडे करिअर संपले आहे. या खेळाडूने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच घोषित केले होते की तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही.

वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली आहे. क्विंटन डी कॉकने आधीच जाहीर केले होते की तो 2023 च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही. तो यापुढे वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, डी कॉक टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

डी कॉकची वनडे कारकीर्द

क्विंटन डी कॉकने आपल्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 155 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 6770 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 21 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत. आम्ही तुम्हाला सांगूया की क्विंटन डी कॉकने यापूर्वी 2021 मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी एकूण 54 कसोटी खेळल्या. या कालावधीत त्याने 38.82 च्या सरासरीने 3300 धावा केल्या. डी कॉकने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण सहा शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत.

ODI World Cup: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार World Cup 2023 ची फायनल

विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी

क्विंटन डी कॉकसाठी 2023चा विश्वचषक खूप संस्मरणीय ठरला. यावर्षी त्याने स्पर्धेत 10 सामने खेळले आणि 59.40 च्या सरासरीने 594 धावा केल्या. या काळात त्याने 4 शतकी खेळीही खेळली.