ODI World Cup: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार World Cup 2023 ची फायनल

AUS vs SA: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक 2023 चा उपांत्य सामना कोलकातामध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 3 विकेटने जिंकला.

WhatsApp Group

AUS vs SA, World Cup Semi-Final: पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप 2023 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. 2015 नंतर यूपी कांगारू संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. आणि 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामना होणार आहे.

2023 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला 213 धावांचे लक्ष्य दिले होते, जे कांगारूंनी 7 विकेट्स गमावून अवघ्या 47.2 षटकांत पूर्ण केले.

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 48 चेंडूत 62 धावांची शानदार खेळी केली. हेडने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. वॉर्नरनेही 18 चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 29 धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनी अवघ्या 37 चेंडूत 60 धावांची सलामी भागीदारी करत ऑस्ट्रेलियासाठी धावांचे आव्हान सोपे केले. मात्र, अखेरीस पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने संघाला विजयापर्यंत नेले. स्टार्क 38 चेंडूत 16 धावा करून नाबाद परतला आणि कमिन्स 29 चेंडूत 14 धावा करून नाबाद परतला.

ऑस्ट्रेलियन संघ 8व्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया विरुद्ध कांगारूंचा अंतिम सामना होणार आहे.

आता 2003 नंतर पुन्हा एकदा 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघाने 1983, 2003, 2011 नंतर चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर कांगारू संघ 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 नंतर आठव्यांदा विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. 20 वर्षांपूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया 19 नोव्हेंबरला मैदानात उतरणार आहे.