WTC 2023-25 Points Table: टीम इंडियाला मोठा धक्का! WTC पॉइंट टेबलमध्ये बांगलादेशच्या खाली

WhatsApp Group

WTC 2023-25 Points Table: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सेंच्युरियन कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारताचा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे गुणतालिकेतही पूर्णपणे बदल झाला आहे. पराभवामुळे भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून खाली गेला आहे. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंगले आहे. भारताला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकता आलेली नाही, आता पुन्हा एकदा हा विक्रम अबाधित राहिला आहे.

विराट कोहलीने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी 

सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाच्या पराभवामुळे भारत पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या पराभवाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वी भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता, मात्र आता भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला याचा मोठा फायदा झाला आहे. केवळ एका विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघासाठी कठीण झाले आहे. जर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पुढील सामना हरला तर पुनरागमन करणे खूप कठीण होईल.

Hina Khan Hospitalised: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, नेमके काय झाले?

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचा कर्णधार आणि फलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही डावात रोहित शर्माची कामगिरी निराशाजनक झाली आहे. रोहितने पहिल्या डावात 51 धावा केल्या होत्या, मात्र दुसऱ्या डावात रोहितचे खातेही उघडता आले नाही. अशा परिस्थितीत रोहितच्या कर्णधारपदासह त्याच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने रोहितला दोन्ही डावात बाद केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे रोहितचे लक्ष्य असेल.