डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका, राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. आता त्यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवता येणार नाही.

WhatsApp Group

Donald Trump Disqualified In US Presidential Election : पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. यानंतर ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत आणि मतदानही करू शकणार नाहीत. न्यायालयाने त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवले आहे. Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण, 8 रुग्ण एकट्या मुंबईत

पुढच्या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवणार होते. यापूर्वी कॅपिटल हिंसाचार प्रकरणी निकाल देताना कोलोरॅडो न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे. त्यांचे नाव मतदान यादीतून वगळण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या मार्गाला ब्रेक लागला असून, त्यांना निवडणुकीत मतदानही करता येणार नाही. Kangana Ranaut: बॉलीवूड क्वीन कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास आणि मतदान करण्यास मनाई करण्यात आली आहे. 14 व्या घटनादुरुस्तीच्या कलम 3 अंतर्गत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र उमेदवार आहेत. धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडलं