क्रांती रेडकर ही वानखेडेंची दुसरी बायको? पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल!

WhatsApp Group

मुंबई – सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप लावल्याने खळबळ उडाली आहे. मात्र वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसते नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आपल्या अधिकृत ट्विटरला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो असून या फोटोला पेहचान कौन? असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचे म्हटले जात आहे. यामुले नवाब मलिक यांचं हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मलिकांनी केलेल्या ट्वीटच्या खाली काही लोकांना समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. या फोटोत वानखेडे लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसत असून हा फोटो त्यांच्या पहिल्या लग्नाचा आहे असं बोललं जात आहे. हा फोटो संध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी अजून एक फोटो ट्वीट केला असून यात समीर वानखेडेंचा जन्मदाखला दिसत आहे. या फोटोमध्ये समीर यांचं नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असं लिहीलं असून त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहीलं आहे.


NCB अधिकारी समीर वानखेडे आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. आता या वानखेडेंच्या जुन्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.