झी मराठीच्या अवॉर्डमध्ये झळकणार सावंतवाडीचं ‘मोती तलाव’

WhatsApp Group

सावंतवाडी – तळकोकणातल्या सावंतवाडी तालुक्याला लाभलेला ऐतिहासिक मोती तलाव आता ‘झी मराठी अवॉर्ड 2021’ या सोहळ्यात झळकताना दिसून येणार आहे. आज सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. यादरम्यान सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये या सोहळ्याचा बॅनर देखील सोडण्यात आला आहे. सावंतवाडीकरांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.

झी मराठी अवॉर्ड 2021ची मोठ्या आनंदात तयारी सुरू आहे. आज या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. महत्वाचे म्हणजे  सावंतवाडीच्या मोती तलावाचे काही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपले जाणार आहे. सावंतवाडीतील राहिवाश्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. ड्रोनच्या माध्यमातून लाईव्ह चित्रीकरण केले जाईल अशी माहिती झी मराठीकडून देण्यात आली आहे.