
टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या ग्लॅमरस लुक आणि दमदार डान्स व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘रा रा रेड्डी’ या सुपरहिट तेलगू गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. हे गाणे अभिनेता नितीन आणि अंजली यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे, जो लोकप्रिय तेलुगू डान्स नंबर आहे. धनश्रीचे डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री तिच्या जोडीदारासोबत डान्स करताना दिसत आहे. तुम्हाला हा दमदार डान्स परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. या व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
धनश्रीने #rarareddyiamready हॅशटॅगसह हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, ‘मी नेहमीच तयार आहे.’ काही तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत 3 लाख 72 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
यापूर्वी धनश्रीने इंग्लंडहून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों…’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. तिचा तो व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.