‘मी महिनाभरासाठी माहेरी जाणार आहे’, आडनावाच्या वादानंतर धनश्री-युजीचा पहिला व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. अलीकडेच त्यांच्या विभक्त झाल्याची अफवा पसरली होती, जी दोघांनीही फेटाळून लावली. आता दोघेही इंस्टाग्राम रीलमध्ये एकत्र दिसत आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या हशावर नियंत्रण ठेवता येत नाही. या व्हिडिओमध्ये दोघेही सोफ्यावर एकत्र बसले आहेत आणि धनश्री माहेरी जाण्याचे बोलताच चहल आनंदाने नाचू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्या विभक्त झाल्याची अफवा पसरल्यानंतर दोघांचा हा पहिलाच व्हिडीओ आहे.

चहल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियासोबत गेला नव्हता पण 2022च्या आशिया कपसाठी तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना झाला आहे. आशिया चषकात भारताला 27 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.

Kala Chashma गाण्यावर भारतीय खेळाडूंचा बेभान डान्स, पहा व्हिडिओ