युझवेंद्र चहलने इतिहास रचला, शेन वॉर्नचा 13 वर्ष जुना विक्रम मोडला

WhatsApp Group

Yuzvendra Chahal: भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. आतापर्यंत, चहलने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 10 एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने 4 षटकात 43 धावा दिल्या पण 2 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. यासह चहलने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा 13 वर्षे जुना विक्रमही मोडला.

चहल राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज 
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट्स घेत युझवेंद्र चहल आता आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चहल 2022 च्या आयपीएल हंगामात राजस्थान संघाचा भाग बनला, तेव्हापासून त्याने 36 सामने खेळताना राजस्थानसाठी 58 बळी घेतले आहेत. तर 2008 ते 2011 या काळात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून खेळलेल्या शेन वॉर्नने 55 सामन्यात 57 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या सिद्धार्थ त्रिवेदीच्या नावावर आहे ज्याने 76 सामन्यांमध्ये 65 बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर शेन वॉटसनचे नाव आहे ज्याने 78 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत युझवेंद्र चहल सध्या पहिल्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्याने 150 सामने खेळताना 21.25 च्या सरासरीने 197 विकेट्स घेतल्या आहेत. आता चहल आयपीएलमध्ये 200 विकेट पूर्ण करण्याच्या आकड्यापासून फक्त 3 विकेट्स दूर आहे. चहल जर ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये हा इतिहास रचणारा पहिला खेळाडूही ठरेल. राजस्थान रॉयल्स संघाला या हंगामात आपला पुढचा सामना 13 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे.