
प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इंग्लिश प्रीमियर लीगमधील एव्हर्टनविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील 700 वा गोल केला. यावेळी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचे अभिनंदन करणारे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहते युवराजला यासाठी ट्रोलही करत आहेत.
वास्तविक, रोनाल्डोने प्रीमियर लीगमध्ये एव्हर्टनविरुद्ध गोल केला. या गोलसह त्याने कारकिर्दीतील 700 गोल पूर्ण केले. रोनाल्डो फुटबॉलपटू अँटोनी मार्शलला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी खेळत होता. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने क्रिकेटर युवराज सिंगनेही ट्विटरवर रोनाल्डोसाठी एक ट्विट केले आहे.
King 👑 is back ! Form is temporary class is forever !!! @Cristiano welcome to 700 club ! No7 #GOAT𓃵 #legend siiiiiiiiiiii !!!!! @ManUtd
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 9, 2022
युवराज सिंगने आपल्या ट्विटमध्ये रोनाल्डोसाठी लिहिले, राजा परत आला आहे! Form is temporary class is forever !!! @Cristiano welcome to 700 club ! असं लिहिलं आहे. त्याच्या या ट्विटवर यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. वास्तविक, युवराजने या ट्विटमध्ये ‘700 क्लबमध्ये आपले स्वागत आहे’ असे लिहिले आहे, ज्यामुळे तो ट्रोलच्या निशाण्यावर आला. क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल करणारा रोनाल्डो पहिला खेळाडू ठरला आहे. अशा स्थितीत युवराजच्या 700 क्लबमध्ये एंट्री झाल्याबद्दल लिहिताना ट्विटर यूजर्स हैराण झाले आणि त्यांनी सिक्सर किंगच्या ट्विटरवर क्लास लावला. अनेक वापरकर्त्यांनी त्याच्या इंग्रजीच्या ज्ञानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.