
Yuvraj Singh Team India T20 World Cup 2007 On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगने अनेक महान विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. युवराजने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याने अशीच खेळी खेळली होती. युवराजने याच दिवशी इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा षटकार ठोकले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा युवी पहिला खेळाडू ठरला होता.
टी-20 विश्वचषक 2007 च्या गट सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. यादरम्यान युवराज सिंगने अवघ्या 16 चेंडूत 58 धावा केल्या. युवीने यावेळी 7 षटकार आणि 3 चौकार मारले. विशेष म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्याने सहा षटकार ठोकले. ब्रॉडने भारतीय डावात 19वे षटक केले. युवीने पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. यानंतर त्याने सलग पाच षटकार ठोकले. अशाप्रकारे या षटकात सहा षटकारांसह 36 धावा झाल्या.
6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣
Happy birthday @YUVSTRONG12! 🎂 pic.twitter.com/0ZFS3EBHnw
— ICC (@ICC) December 12, 2019
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 200 धावा करू शकला. यादरम्यान विक्रम सोलंकीने संघाकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. कर्णधार पॉल कॉलिंगवूडला 20 चेंडूत केवळ 28 धावा करता आल्या. भारताकडून इरफान पठाणने शानदार गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. तर आरपी सिंगने 2 बळी घेतले होते. टीम इंडियाने हा सामना 18 धावांनी जिंकला.