युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन भर मैदानात भिडले, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

लीजेंड्स लीगचा पहिला क्वालिफायर इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना 4 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनशी भिडताना दिसत आहे. काही वेळाने या शाब्दिक युद्धाचे हाणामारीत रूपांतर झाले.

व्हायरल व्हिडिओमध्ये युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे, काही सेकंदांनंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यानंतर जॉन्सन पठाणला धक्काबुक्की करतो. नंतर जॉन्सन हसत निघून जातो. यादरम्यान संघातील इतर खेळाडूंसह पंचांनाही मदतीला यावे लागते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा