मंत्री दादा भुसेंकडून तरुणांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

गेल्या काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हाव लागल्यापासून भाजप आणि शिंदे गटाकडून महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच होत आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मंत्री दादा भुसे यांचा जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. तरुणाला धमकावल्याचा आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विरोधकांकडून शिंदे गटाच्या दुसऱ्या एका मंत्र्यावर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा