VIDEOआंबोली घाटात रस्त्यावरच तरूणांची हुल्लडबाजी, पर्यटकांना मनस्ताप

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – कोकणातील आंबोली घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसांत येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या काळातच काही पर्यटक तरूण रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत त्यामुळे याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी होत आहे.

आंबोली घाटात रस्त्यावरच गोंधळ घालत डान्स करणाऱ्या काही तरूणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते रस्तावरील वाहनांना अडवूनच गोंधळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे.