
मुंबई : मुंबईसह राज्यभरात सर्वच ठिकानो जल्लोषात नवरात्री उत्सव (Navratri 2022)साजरा केला जात आहे. मात्र मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंड येथे गरबा (Garba) खेळताना दुर्दैवी घटना घडली आहे. जर तुम्ही गरबा (Garba) खेळायला जाताय तर जरा जपून. कारण मुंबईच्या मुलुंडमध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. मुंबईत भाजन नेते मनोज कोटक यांच्या गरब्यात हा तरुण सहभागी झाला होता. ऋषभ मंगे असं या तरुणाचं नाव आहे.
हा तरुण मुंबईमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. गरबा खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे मुलुंडच्याच आदिती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मयत घोषित केलं.