सापासोबत सेल्फी काढताना सर्पदंश होऊन तरुणाचा मृत्यू

WhatsApp Group

गळ्यात साप बांधून भगवान शिव बनण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोट्टी श्रीरामुलू जिल्ह्यातील कंदुकुर येथे घडलेली ही घटना सध्या व्हायरल झाली आहे.

तल्लूर येथील मणिकांत रेड्डी हा कंदुकुरू येथे ज्यूसचा स्टॉल चालवत होता. मंगळवारी सायंकाळी मणिकांत रेड्डी यांना तेथे एक सर्पमित्र येताना दिसला. काही वेळ सापांना खेळताना पाहिल्यानंतर मणिकांतने सेल्फी घेण्याचे ठरवले. त्याने सर्पमित्राला सांगितले आणि सापाला हातात घेतले.

त्याने गळ्यात साप घातला आणि फोटो काढत होता. फोटो काढल्यानंतर निघताना सापाने तरुणाला चावा घेतला. त्यामुळे मणिकांतला ओंगोले रिम्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मणिकांत रेड्डी यांना जीव गमवावा लागला.