
पुण्यात सोशल मीडिया ॲपवरुन झालेल्या ओळखीतून एका तरूणीने खंडणीची मागणी करत ती न दिल्यास न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पुण्यात दत्तवाडी येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
शंतनू वाडकर (वय 19, रा. दत्तवाडी) असं आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शंतनूची प्रीत यादव या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगली ओळख झाल्यानंतर शंतनूने तिला आपले न्यूड फोटो पाठवले. याचाच फायदा घेत प्रीत यादव या नावाच्या तरुणीने पैसे दे नाहीतर सर्व फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. या तरुणीच्या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शंतनूची प्रीत यादव या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगली ओळख झाल्यानंतर शंतनूने तिला आपले न्यूड फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे नाहीतर फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. त्यानंतर शंतनूने तिला 4,500 रुपये दिले होते. मात्र त्यानंतर टी तरुण शंतनूकडे सतत पैसे मागू लागली. तिच्या या त्रासाला कंटाळून या तरुणाने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला आधीच मृत घोषित केले.