तरुणाने पाण्याखाली केला गरबा डान्स, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

नवरात्री संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु गुजरातमध्ये हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कारण नवरात्रीच्या निमित्ताने गुजराती केवळ पूजाच करत नाहीत तर गरबाही खेळतात. गरबा हे पारंपारिक नृत्य आहे, ज्यामध्ये हात-पायांची हालचाल असते आणि टाळ्या वाजवून नृत्य केले जाते, हे तुम्हाला माहीत असेलच. त्याचप्रमाणे दांडिया हा देखील एक प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये दांडिया काठी वापरली जाते. आजकाल एक व्यक्ती चर्चेत आहे कारण तो जमिनीवर नाही तर पाण्याखाली हे सर्व नृत्य प्रकार करताना दिसत आहे.

हायड्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला भारतातील पहिला अंडरवॉटर डान्सर जयदीप गोहिलने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाण्याखाली गरबा आणि दांडिया करताना दिसत आहे. अशा व्हिडीओजच्या माध्यमातून जयदीप सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. कधी तो पाण्याखाली त्याच्या स्कूटरने स्टंट करताना दिसतो तर कधी स्नूकर खेळायला लागतो. पण यावेळी तो गरबा करतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hydroman (@hydroman_333)