
आजकाल अनेक पुरुष लिंग ताठरता (Erectile Dysfunction) आणि लैंगिक क्षमतेच्या समस्यांमुळे चिंतेत आहेत. या समस्येचे मूळ कारण तणाव, चुकीची जीवनशैली, पोषणाचा अभाव, निद्रानाश किंवा वैवाहिक नात्यांमधील तणाव असू शकते. या समस्यांवर झटपट उपाय म्हणून बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या औषधांचा वापर अनेक पुरुष करताना दिसतात. मात्र, ‘त्या’ गोळ्या घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
लैंगिक शक्तिवर्धक गोळ्या म्हणजे नेमकं काय?
लैंगिक शक्तिवर्धक गोळ्या म्हणजे अशा औषधांचा एक प्रकार जो लिंगात रक्तप्रवाह वाढवून ताठरता आणतो. या गोळ्यांमध्ये सिल्डेनाफिल (Viagra), टॅडालाफिल (Cialis)यांसारख्या घटकांचा समावेश असतो. या गोळ्या तात्पुरता परिणाम देतात, पण योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर धोकादायक ठरू शकतो
या गोळ्यांच्या वापराचे संभाव्य धोके
1. हृदयावर परिणाम – हृदयविकार असलेल्या रुग्णांनी या गोळ्यांचा वापर केल्यास ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते.
2. डोकेदुखी व चक्कर येणे – अचानक रक्तप्रवाह वाढल्यामुळे डोकं गरगरू शकतं.
3. दृष्टी धूसर होणे– काही वेळा दृष्टीवर परिणाम होऊन डोळ्यांसमोर धुके येण्याची तक्रार होते.
4. सवयीची शक्यता – या गोळ्यांचा सतत वापर केल्यास नैसर्गिक लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो.
5. मानसिक अवलंबित्व – काही पुरुष मानसिकदृष्ट्या या गोळ्यांवर अवलंबून होतात आणि नैसर्गिक संभोग शक्यच वाटत नाही.
योग्य पर्याय आणि नैसर्गिक उपाय
लिंग ताठरतेची समस्या कायमची दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
1. योग आणि व्यायाम
दररोज किमान 30 मिनिटे वॉक किंवा योग केल्याने रक्तप्रवाह सुधारतो.
‘किगेल’ (Kegel) व्यायाम लिंगातील स्नायूंना बळकट करतो.
संतुलित आहार
पालेभाज्या, ताजे फळ, सुकामेवा (खासकरून बदाम, अक्रोड), आणि झिंक-समृद्ध अन्नपदार्थ सेवन करा.
लसूण, कांदा, आवळा, आणि अश्वगंधा यांचे सेवन लाभदायक ठरते.
3. तणावमुक्त राहणे
मेडिटेशन, प्राणायाम यांचा अवलंब केल्यास मानसिक आरोग्य सुधारते आणि लैंगिक इच्छा नैसर्गिकरित्या वाढते.
4. तंबाखू व मद्याचा त्याग
धूम्रपान आणि मद्यपानामुळे शिश्नातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे लिंग ताठरता कमी होते.
डॉक्टरांचा सल्ला घेणे का गरजेचे आहे?
तुम्हाला सतत लैंगिक दुर्बलतेचा अनुभव येत असेल तर औषधांच्या मागे न लागता प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेक वेळा ही समस्या शारीरिक नसून मानसिक असते. सेक्सोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टकडून वैद्यकीय तपासणी करूनच औषधोपचार घ्यावेत.
‘त्या’ गोळ्या घेतल्याने क्षणिक समाधान मिळू शकतं, पण दीर्घकाळासाठी त्याचा वापर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. नैसर्गिक उपाय, आरोग्यदायी सवयी आणि तज्ञांचा सल्ला हेच दीर्घकालीन व सुरक्षित पर्याय आहेत. लैंगिक क्षमता हा कोणत्याही पुरुषाच्या आत्मविश्वासाशी जोडलेला मुद्दा आहे, त्यामुळे निर्णयही विचारपूर्वक आणि जबाबदारीने घ्यावा.