![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
भाजप महिला अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिच्यावर नग्नतेचा आरोप केला आहे. त्यानंतर उर्फी जावेदने वाघ यांच्या कमेंटवर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी म्हणाली, जोपर्यंत त्यांचे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत त्याला तुरुंगात टाकता येणार नाही. चित्रा किशोर वाघ यांनी ट्विट करत लिहिले होते की, मुंबईत काय चालले आहे? मुंबईच्या रस्त्यावर खुलेआम नग्नता करणाऱ्या या महिलेला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे आयपीसी/सीआरपीसीचे कोणते कलम आहे का? तिला लवकरात लवकर अटक करावी असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
चित्रा किशोर वाघ यांच्या कमेंटला उत्तर देताना उर्फी जावेदने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका राजकारण्याच्या पोलिस तक्रारीने होत आहे! या राजकारण्यांना खरे काम नाही? हे राजकारणी आणि वकील मुके आहेत का? घटनेत असे कोणतेही कलम नाही जे मला लागू करून मला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे लोक हे करत आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी आणि लैंगिक तस्करी होत आहे, मी याच्या विरोधात आहे. मुंबईत पुन्हा सर्वत्र सुरू असलेले अवैध डान्सबार आणि वेश्याव्यवसाय सुरू आहेत ते बंद करायचे कसे?
उर्फी पुढे म्हणाली की, मला खटला किंवा मूर्खपणा नको आहे, जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती उघड केली तर मी आत्ता तुरुंगात जाण्यास तयार आहे. राजकारणी किती आणि कुठून कमावतो हे तुम्ही जगाला सांगा.
उर्फी जावेदचे व्हिडिओ
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram