उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. पक्षाने विधानसभेच्या 403 जागांपैकी 255 जागा जिंकल्या आहेत. काल, उत्तर प्रदेशातील विजयी आमदारांनी योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा मांडला होता. त्यानुसार शुक्रवारी योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची Uttar Pradesh CM शपथ घेतली.
आज लखनऊ में प्रदेश मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी के भव्य शपथ ग्रहण समारोह में उपस्थित रहकर योगीजी , उपमुख्यमंत्री श्री @kpmaurya1 जी व @brajeshpathakup जी समेत पूरे मंत्रीमंडल को अपनी शुभकामनाएँ दीं। pic.twitter.com/nKYccC8hgW
— Anurag Thakur (@ianuragthakur) March 25, 2022
योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांचे 46 मंत्रीही शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीची जोरदार तयारी करण्यात आली होती. शपथविधी सोहळ्यासाठी अनेक विशेष पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहिले होते. याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.
उत्तर प्रदेशात तीन दशकांनंतर एक व्यक्ती सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ काल दुपारी 4 वाजता लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये शपथ घेतली.