
पुणे – काही तासामध्येच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर येऊन धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात ९ जिल्ह्यांना (districts) यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या २ दिवसामध्ये केरळ (Kerala) किनारपट्टीवर मुसळधार पावसाची (rain) शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवले आहे.
१६ ते १९ मेच्या दरम्यान, महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर (Kolhapur), सातार, सांगली तसेच मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर (Latur) या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.