
जॉर्जियामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षीय यशोधरा शिंदेच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला, ज्याने सर्व काही बदलून टाकले. वास्तविक तिच्या वडिलांनी फोनवर तिला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वड्डी गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवण्यास सांगितले, त्यामुळे ती बॅग भरून भारतात परतली. यशोधरा म्हणते, ‘हा असा निर्णय होता ज्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही.’ सांगली जिल्ह्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत ती सरपंचपदी निवडून आली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागांवर उमेदवार निवडून आले आहेत.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, यशोधरा म्हणाली, ‘मी माझ्या गावातील लोकांचा विश्वास अनुभवू शकते कारण मी येथे अनेक वर्षांपासून राहत आहे, त्यामुळे माझ्या गावासाठी माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. मला इथल्या समस्या माहित आहेत. महिला व बालकांच्या आरोग्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
यशोधरा म्हणाली, ‘माझे आजोबा आणि आजी या दोघांनीही शेजारच्या नरवाड गावचे सरपंच म्हणून 15 वर्षे योगदान दिले आहे. माझ्या कुटुंबातील कोणीतरी या पदासाठी निवडणूक लढवावी, या आशेने पुन्हा एकदा विकास पाहायला मिळेल, अशी येथील जनतेची इच्छा होती.
लवकर आवरा महत्त्वाची कामं, 2023 मध्ये हे मोठे बदल होणार आहेत!
यशोधराला सरपंच का व्हायचं होतं?
सांगली जिल्ह्यातील मिरज शहराजवळील वड्डी हे 5000 लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत यशोधरा महेंद्रसिंह शिंदे या सरपंचपदाच्या उमेदवार झाल्या. परदेशाप्रमाणे स्वच्छ पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाहीत? असा विचार करून तिने थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली.
मी माझा अभ्यास ऑनलाइन पूर्ण करेन- यशोधरा
जवळपास 147 मतांनी विजयी झाल्यानंतर यशोधराला तिचा अभ्यास थांबवायचा नाही. ती म्हणाली, ‘मी आता चौथ्या वर्षात आहे, माझे मेडिकल ग्रॅज्युएशन पूर्ण होण्यासाठी फक्त दीड वर्ष बाकी आहे. मी ते ऑनलाइन पूर्ण करेन. जॉर्जियामध्ये राहणार्या माझ्या मित्रांनी मला अभिनंदन करण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत देण्यासाठी कॉल केला. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न असून या सोबतच सरपंच पद भूषवत जनतेची सेवा करत राहीन.