यशस्वी जैस्वालने कसोटी पदार्पणातच ठोकलं शतक, ठरला कसोटी पदार्पणात शतक करणारा १७ वा खेळाडू

WhatsApp Group

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना यशस्वी जैस्वालने पहिल्याच सामन्यापासून धडाकेबाज सुरुवात केली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत सर्किटमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या या युवा डावखुऱ्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पहिल्या डावातच शतक झळकावले Yashasvi Jaiswal Test hundred .

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २१ वर्षीय यशस्वीने शतक झळकावले. भारतासाठी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १७वा भारतीय खेळाडू ठरला. वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यासारख्या खेळाडूंच्या एलिट यादीत त्याने आपले नाव जोडले.


यशस्वी जैस्वालने 215 चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 11 चौकार मारले. शतक झळकावल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. कर्णधार रोहित शर्मानेही त्याला प्रोत्साहन देताना मिठी मारली. प्रशिक्षक राहुल द्रविडसह इतर सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममधून यशस्वीला शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या खेळीने दाखवून दिले की तो केवळ टी-२० मध्येच धडाकेबाज फलंदाजी करू शकत नाही तर कसोटीतही तो समंजसपणे फलंदाजी करू शकतो. तसेच कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा सलामीवीर ठरला. त्याच्या आधी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली होती. ( Yashasvi Jaiswal slams maiden Test hundred on debut )

भारतासाठी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे खेळाडू

  • लाला अमरनाथ (वि. इंग्लंड 1933)
  • दीपक शोधन (वि. पाकिस्तान १९५२)
  • अर्जन कृपाल सिंग (वि. न्यूझीलंड १९५५)
  • अब्बास अली बेग (वि. इंग्लंड १९५९)
  • हनुमंत सिंग (वि. इंग्लंड 1964)
  • गुंडप्पा विश्वनाथ (वि. ऑस्ट्रेलिया १९६९)
  • सुरिंदर अमरनाथ (वि. न्यूझीलंड 1976)
  • मोहम्मद अझरुद्दीन (वि. इंग्लंड 1984)
  • प्रवीण अमरे (वि. दक्षिण आफ्रिका 1992)
  • सौरव गांगुली (वि. इंग्लंड 1996)
  • वीरेंद्र सेहवाग (वि दक्षिण आफ्रिका 2001)
  • सुरेश रैना (वि. श्रीलंका 2010)
  • शिखर धवन (वि. ऑस्ट्रेलिया 2013)
  • रोहित शर्मा (वि. वेस्ट इंडिज 2013)
  • पृथ्वी शॉ (वि. वेस्ट इंडिज 2018)
  • श्रेयस अय्यर (वि न्यूझीलंड २०२१)
  • यशस्वी जैस्वाल (वि. वेस्ट इंडीज २०२३*)