IND vs ZIM: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने 13 धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
टीम इंडियाची युवा खेळाडू यशस्वी जैस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. T20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिकंदर रझा पहिला षटक टाकायला आला होता. पहिल्याच चेंडूवर रझाने नो-बॉल टाकला आणि यशस्वीने षटकार ठोकला होता. यासह त्याने एकही चेंडू न खेळता 7 धावा केल्या होत्या. पुढच्याच चेंडूवर त्याने पुन्हा षटकार ठोकला. यासह यशस्वीने एकाच चेंडूवर 13 धावा केल्या.
Yashasvi Jaiswal became the first batter in history to score 13 runs on the 1st ball of a T20i. 🌟pic.twitter.com/98j63xmtGu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 14, 2024