राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, यशस्वी जैस्वालने केवळ 13 चेंडूत 50 धावांचा आकडा गाठला. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तर केएल राहुल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
IPL 2018 मध्ये, केएल राहुलने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात फक्त 14 चेंडूत अर्धशतक केले. त्याचवेळी पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2022 मध्ये पॅट कमिन्सने 14 चेंडूत हा पराक्रम केला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ होता.
Fastest FIFTY in the IPL
Yashasvi Jaiswal brings up his half-century in just 13 deliveries 👏👏#TATAIPL #KKRvRR pic.twitter.com/KXGhtAP2iy
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2023
आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू
यशस्वी जैस्वाल – 13 चेंडू विरुद्ध केकेआर, 2023
केएल राहुल – 14 चेंडू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2018
पॅट कमिन्स – 14 चेंडू विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2022
युसूफ पठाण – 15 चेंडू विरुद्ध एसआरएच, 2014
सुनील नारायण – 15 चेंडू विरुद्ध आरसीबी, 2017
यासह यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. नितीश राणाच्या षटकात 26 धावा फटकावत त्याने आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात महागडे षटक बनवले. तसेच, आयपीएलच्या या मोसमात 500 धावांचा टप्पा पार करणारा तो फाफ डू प्लेसिसनंतरचा पहिला भारतीय आणि दुसरा खेळाडू ठरला.