रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यातच विश्वचषक विजयी कर्णधार यश धुलने झळकावलं शानदार शतक!

WhatsApp Group

कोरोनामुळे गेल्या मोसमात न झालेली रणजी ट्रॉफी सूरू झाली आहे. या स्पर्धेत दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात अंडर-19 विश्वचषक विजयी संघाचा कर्णधार यश धुलने आपल्या रणजी कारकिर्दीची शानदार सुरुवात केली Yash Dhull scored a century in Ranji Trophy. दिल्लीकडून खेळणाऱ्या धुलने पदार्पणाच्या सामन्यातच तमिळनाडूविरुद्ध शतक झळकावले आहे.

गुवाहटीमध्ये सुरू असलेल्या या मॅचमध्ये तामिळनाडूचा कॅप्टन विजय शंकरने Vijay Shankar टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यश धूल दिल्लीकडून ओपनिंगला उतरला होता. तामिळनाडू विरूद्ध दिल्लीची सुरूवात खराब झाली होती. दिल्लीने 7 रनावर 2 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर यशनने दिल्लीची इनिंग सावरली.

यश धूलने सुरूवातीला नितिश राणासोबत Nitish Rana तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागिदारी केली. राणा आऊट झाल्यानंतरही यश धूलचा धडाका सुरू होता. त्याने पदार्पणातील मॅचमध्येच पहिले शतक हे 133 बॉलमध्ये पूर्ण केले आहे. तामिळनाडूच्या सर्व गोलंदाजांचा त्याने समाचार घेतला. यश धूल अखेर 150 बॉलमध्ये 113 रन काढून आऊट झाला. ही खेळी साकारताना त्याने 18 चौकार लगावले.