धक्कादायक बातमी! भारताच्या कर्णधाराला आणि उपकर्णधाराला कोरोनाची लागण

WhatsApp Group

सध्या सुरू असलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद आणि संघातील इतर चार सदस्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कारणामुळे बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून ते बाहेर पडले आहेत.


आराध्या यादव, वासू वत्स, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही आयर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार आणि उपकर्णधार यांच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारत बुधवारी आयर्लंडविरुद्ध आपला दुसरा सामना खेळत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळत विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. मात्र आता संघात हे कोरोना संकट आल्याने भारतासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.