Yami Gautam Pregnant : यामी गौतम होणार आई! ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

0
WhatsApp Group

Yami Gautam Pregnant: अभिनेत्री यामी गौतमने 2021 आदित्य धारसोबत लग्नगाठ बांधली. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमाच्या सेटवर ते एकमेकांना भेटले. यानंतर दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांचं त्यांनाही कळालं नाही. या दोघांनी पारंपरिक पद्धतीने हे लग्न केलं. यामीच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर तीन वर्षांनी यामी आणि आदित्य आईबाबा होणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, यामी गौतम साडे पाच महिन्यांची गरोदर आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या गरोदरपणाच्या बातम्या देत आहेत. तर अनेकजण आई-बाबा झाल्याचा आनंद त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.  नुकतीच अशी बातमी समोर आलेल्या बातमीनुसार, अभिनेत्री यामी गौतमी दुसऱ्यांदा आई होणार आहे. तर विक्रांत मैसी नुकताच बाबा झाला आहे. मात्र या सगळ्या दरम्यान अभिनेत्री यामी गौतम लवकरच आई होणार आहे. तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिची ही बातमी ऐकताच तिचे चाहते कमालीचे खूश आहेत.

लग्नाच्या तब्बल 3 वर्षांनी यामी आणि आदित्य आई – वडील होणार आहेत. यामी प्रेग्नंट असून तिचा बेबी बंप सहीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामी सध्या आर्टिकल 370च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी यामीनं तिच्या बेबी बंपसह हजेरी लावली. यामीनं तिच्या प्रेग्नंसीबाबत स्पष्ट काहीच सांगितलेलं नाही. पण तिनं फ्लॉंट केलेला क्यूट बेबी बंप सगळं काही आधीच सांगून गेला.

यामी गौतमी हिचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आर्टिकल 370 सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळेचा आहे. ट्रेलर लाँच वेळी यामी खास व्हाइट कलरचा वन पीस घालून आली होती. त्यावर तिनं ब्राऊन कलरचं फुल स्लिव्ह्सचे जॅकेट कॅरी केलं होतं. जॅकेटमध्ये यामी तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत होती.