Y Teaser : ‘वाय’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

WhatsApp Group

Y Teaser : मुक्ता बर्वेने (Mukta Barve) हातात मशाल धरलेले ‘वाय’ या चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता ‘वाय’ चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहेत.

चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि ‘वाय’ या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे.