WWE चॅम्पियनची मृत्यूशी झुंज अपयशी; 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
WhatsApp Group

WWE रेसलिंग वर्ल्डमध्ये फार कमी वेळात वेगळी ओळख निर्माण करणारा ब्रे व्याट आणि द फिएंड या नावाने WWE खेळणारा विंडहॅम रोटुंडा याचे वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले आहे. तो दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. याबाबत त्याने कोणालाही माहिती दिली नव्हती, मात्र अचानक रिंगपासून दूर गेल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. यानंतर, आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे, जी ट्रिपल एचने दिली आहे.

ट्रिपल एच ने ट्विट करून सर्वांना माहिती दिली की, WWE हॉल ऑफ फेमर माईक रोटुंडा यांनी मला दुःखद बातमी सांगितली की आमच्या WWE कुटुंबातील सदस्य विंडहॅम रोटुंडा यांचे अचानक निधन झाले आहे. यासोबत कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Bray Wyatt च्या WWE कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, एकदा WWE चॅम्पियनचे विजेतेपद मिळवण्याव्यतिरिक्त, त्याने WWE युनिव्हर्सलचे विजेतेपद देखील दोनदा जिंकले आहे. Bray Wyatt ने मॅच हार्डीसह एकदा WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपचे विजेतेपद देखील जिंकले आहे. व्याटच्या पुनरागमनाबद्दलही अटकळ होती की तो लवकरच बरा होईल.

व्याट हे कुस्ती कुटुंबातून आले आहेत आणि त्याचे वडील रोटुंडा हे 1990 च्या दशकात खूप प्रसिद्ध WWE कुस्तीपटू होते. व्याटने 2012 मध्ये सामंथाशी लग्न केले आणि तिला दोन मुली आहेत. यानंतर 2017 मध्ये दोघेही वेगळे झाले.