WTC final: IND vs AUS: स्टीव्ह स्मिथने मोडले अनेक विक्रम, विराट, ब्रॅडमन, पाँटिंगलाही पछाडले

0
WhatsApp Group

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. स्मिथने या सामन्यात सर डॉन ब्रॅडमन, विराट कोहली, जो रूट, रिकी पाँटिंग यांसारख्या दिग्गज फलंदाजांचे अनेक विक्रम मोडले किंवा त्यांची बरोबरी केली. या सामन्यात स्मिथने 268 चेंडूत 121 धावा केल्या. यादरम्यान त्याने 19 चौकारही मारले. स्मिथच्या फलंदाजीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असेल. चला तर मग या सामन्यात त्याने केलेल्या विक्रमांवर एक नजर टाकूया.

 • ओव्हलवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा पाहुणे फलंदाज
 • 553 – सर डॉन ब्रॅडमन
 • 512 – स्टीव्ह स्मिथ
 • 478 – ऍलन बॉर्डर
 • 448 – ब्रुस मिशेल
 • 443- राहुल द्रविड

 

 • भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेट)
 • 386- रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क, अॅडलेड, २०१२
 • 334* – मायकेल क्लार्क आणि मायकेल हसी, सिडनी, 2012
 • 288 – रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क, सिडनी, 2012
 • 285 – स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड, ओव्हल, 2023
 • 239 – रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ, अॅडलेड १९९९

 

 • इंग्लंडमधील एकाच ठिकाणी पाहुण्या फलंदाजाने केलेली सर्वाधिक शतके
 • 4 – डॉन ब्रॅडमन, हेडिंग्ले
 • 3 – डॉन ब्रॅडमन, ट्रेंट ब्रिज
 • 3 – गॉर्डन ग्रीनिज, ओल्ड ट्रॅफर्ड
 • 3 – ब्रुस मिशेल, ओव्हल
 • 3 – स्टीव्ह स्मिथ, ओव्हल
 • 3 – दिलीप वेंगसरकर, लॉर्ड्स

 

 • इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणारा पाहुणा फलंदाज
 • 11 – सर डॉन ब्रॅडमन
 • 7 – स्टीव्ह वॉ
 • 7 – स्टीव्ह स्मिथ
 • 6 – राहुल द्रविड
 • 6 – गॉर्डन ग्रीनिज

 

 • भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके
 • 9 – जो रूट
 • 9 – स्टीव्ह स्मिथ
 • 8 – रिकी पाँटिंग
 • 8 – सर व्हिव्ह रिचर्ड्स
 • 8 – सर गारफिल्ड सोबर्स

 

 • ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक कसोटी शतके
 • 41 – रिकी पाँटिंग
 • 32 – स्टीव्ह वॉ
 • 31 – स्टीव्ह स्मिथ
 • 30 – मॅथ्यू हेडन
 • 29 – सर डॉन ब्रॅडमन

 

 • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे
 • सचिन तेंडुलकर – 11
 • स्टीव्ह स्मिथ – 9
 • विराट कोहली – 8
 • सुनील गावस्कर – 8
 • रिकी पाँटिंग – 8