WTC Final: रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत, फायनलच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का

0
WhatsApp Group

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलच्या एक दिवस आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. सरावादरम्यान रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे रोहितला मध्येच नेट सत्र सोडावे लागले. रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अंगठ्यावर सेफ्टी टेप लावताना दिसत आहे.

रोहितची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी कर्णधार खेळणार की नाही याबद्दल बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. रोहितची दुखापत हे टीम इंडियासाठी चांगले लक्षण नाही कारण तो कर्णधार तसेच संघाचा सलामीवीरही आहे.

टीम इंडिया आधीच जखमी खेळाडूंच्या समस्येशी झुंजत आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या फायनलमध्ये सहभागी झाले नाहीत आणि आता कर्णधाराच्या दुखापतीने संघाला अडचणीत टाकले आहे.

WTC फायनलसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत:-

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, उमेश यादव. इशान किशन (यष्टीरक्षक).

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.