‘आदिपुरुष’चेलेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे मागितले संरक्षण

WhatsApp Group

देशभराच प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटावर गोंधळ सुरूच आहे. आदिपुरुषमध्ये दाखविलेल्या संवादांबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. दरम्यान, चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या गदारोळात मनोज मुंतशीर यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट आदिपुरुष शुक्रवारी म्हणजेच १६ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र आदिपुरुषमधील संवादांबाबत देशभरात निषेध व्यक्त होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.


 ‘आदिपुरुष’ चित्रपटातील या आक्षेपार्ह संवादांना विरोध होत आहे ( Adipurush dialogue controversy )

1- हनुमान लंकेत गेल्यावर एका राक्षसाने त्याला पाहिले आणि विचारले, ”ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.”
2- सीतेला भेटल्यानंतर हनुमानाला लंकेत राक्षसांनी पकडले तेव्हा मेघनाथ हनुमानाच्या शेपटीला आग लावून विचारतो, जली? प्रत्युत्तरात हनुमान म्हणतो, ”तेल तेरे बाप का. कपड़ा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की.”
3- जेव्हा हनुमान लंकेहून परत येतात आणि राम त्याला विचारतात काय झाले? याला उत्तर देताना हनुमान म्हणतात- बोल दिया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.
4- लक्ष्मणावर हल्ला करताना इंद्रजित एका ठिकाणी म्हणतो, ”मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है.” याशिवाय काही संवाद आणि राम, सीता, हनुमान आणि रावण यांच्या वेशभूषेवरही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.