‘हा’ स्टार खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, मुख्य निवडकर्ता म्हणाले कारण सांगू शकत नाही!

WhatsApp Group

मुंबई : टीम इंडियाला फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिका खेळायची आहेत. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI संघाची घोषणाही केली आहे. निवड समितीने स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची wriddhiman saha संघात निवड केलेली नाही. साहाला संघातून वगळण्याबाबत माध्यमांनी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांना प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तरही मिळाले नाही. श्रीलंका मालिकेसाठी साहाला का घेण्यात आले नाही याचे कारण सांगता येणार नाही, असे ते म्हणाला.

रिद्धिमान साहाने नुकतीच रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यास नकार दिल्याने हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. तो बंगालकडून खेळत होता, पण यावेळी त्याने माघार घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बीसीसीआयने आता साहाला बाजूला सारण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाने त्याच्या जागी ऋषभ पंत आणि त्यानंतर त्याच्या पर्याय म्हणून के एस भरत अधिक विश्वास ठेवला आहे.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही निवडीच्या वेळी वयाला फारसे महत्त्व देत नाही. प्रत्यक्षात ऋद्धिमान साहाला बाहेर का टाकण्यात आले, हे सांगता येणार नाही. पुढे बोलताना चेतन शर्मा म्हणाले की, साहा रणजी ट्रॉफीमध्ये का खेळत नाही हे मलाही माहीत नाही. हे माझे अधिकार क्षेत्र नाही. या प्रकरणात, केवळ राज्य संघटनेला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे.