WPL 2024: मुंबईने मारलं दिल्लीच तख्त! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मिळवला विजय

WhatsApp Group

WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals: शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि पहिल्या सत्रातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आणि शेवटी मुंबईने बाजी मारली.या सामन्यात प्रथम खेळताना दिल्ली संघाने 171 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. या लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 173 धावा केल्या.

हा सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. संघाला दोन चेंडूत पाच धावा हव्या होत्या आणि चेंडू एलिस कॅप्सीच्या हातात होता. यानंतर 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर 55 धावा करून हरमनप्रीत कौर बाद झाली. याआधी सलामीवीर यस्तिका भाटियाने 57 धावांची खेळी केली होती. पण शेवटी नवोदित सजीवन संजना हिने संघाला एका चेंडूवर पाच धावांची गरज असताना तिने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.