WPL 2024: एलिस पेरीने सिक्स मारत फोडली गाडीची काच, Video पहा

WhatsApp Group

वुमन्स प्रीमिअर लीगमधील 11 वा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीच्या पोरींनी बाजी मारली. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि एलिस पेरी (Ellyse Perry) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर आरसीबीने 198 धावांचं आव्हान उभं केलं होतं. सांगलीच्या स्मृती मानधनाने 80 धावांची खेळी केली तर पेरीने 58 धावा केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना युपीला 175 धावाच करता आल्या. अशातच या सामन्यातील एलिस पेरीने डेमो कारची काच (Elysse Perry breaks window) फोडल्याचं समोर आलंय.

स्मृती मानधना आपलं काम करून डगआऊटमध्ये परतली. स्मृती मानधनाने 50 बॉलमध्ये 80 धावांची खेळी केली. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर पेरीने आतिषबाजी सुरू केली. 19 व्या ओव्हरमध्ये  जेव्हा दिप्ती शर्मा गोलंदाजीला होती, तेव्हा पेरीने पुढे येऊन खणखणीत सिक्स मारला. पेरीने मारलेला हा बॉल थेट डगआऊटशेजारी उभ्या असलेल्या गाडीला जाऊन लागला. त्यावेळी त्या गाडीची काच देखील फुटली. गाडीची काच फुटल्याचं पाहून खेळाडू देखील शॉक झाले.