श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयानक: इलेक्ट्रिक कटरने पत्नीचे केले 50 तुकडे, नंतर कुत्र्यांच्या कळपात फेकले…

WhatsApp Group

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच आणखी एक घटना झारखंडच्या साहेबगंजमधून समोर आली आहे. येथे आरोपीने दुसऱ्या पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. महिलेचा पती दिलदार अन्सारी याच्यावर हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवार 17 डिसेंबरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी झारखंडमधील साहिबगंज बोरियो येथून एका महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. हे शवाचे तुकडे कुत्र्यांच्या कळपात फेकून दिले होते, जे ते खात होते. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख रुबिका पहाडी या 22 वर्षीय आदिवासी महिलेची केली. या प्रकरणी पोलिसांनी रबिताचा पती दिलदार अन्सारी याला अटक केली आहे.

साहिबगंज येथील दिलदार अन्सारी याच्यावर त्याची 22 वर्षीय पत्नी रुबिका पहाडी हिचे कटरने 50 तुकडे केल्याचा आरोप आहे. मयत रुबिका पहाडी ही पती दिलदार अन्सारीसोबत बेलटोला येथे प्रेमविवाह करून राहात होती. लग्नानंतर काही दिवसांनीच दिलदारचे पत्नीशी भांडण सुरू झाल्याचा आरोप आहे. शेवटी भांडणाला कंटाळून त्याने धोकादायक प्लॅन केला आणि नंतर पत्नीची हत्या करून इलेक्ट्रिक कटरने तिच्या मृतदेहाचे 50 तुकडे केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्राच्या मागे फेकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलदार अन्सारीच्या कुटुंबीयांना रुबिका आवडत नव्हती. यावरून कुटुंबात वाद सुरू होता. 16-17 डिसेंबरच्या रात्री रुबिकाची हत्या झाली होती. त्यांनी सांगितले की, मृतदेहाचे तुकडे डीएनए सॅम्पलिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मृतकाचा पती दिलदार अन्सारी याने मृतदेहाची ओळख पटवली आहे.

पोलिसांच्या तपासात मुलीची हत्या केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. या घटनेत इतर लोकांचाही सहभाग आहे. चौकशीनंतर काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ समोर आला, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा