World Cup: टीम इंडियाच्या पराभवात ‘हे’ 3 खेळाडू ठरले सर्वात मोठे खलनायक

0
WhatsApp Group

India vs Australia ICC World Cup Final 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्नही भंगले. यापूर्वी 2003च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंनी अतिशय खराब खेळ केला. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवात हे खेळाडू सर्वात मोठे खलनायक ठरले. 

1. चुकीचा शॉट खेळून अय्यर बाद झाला
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली आणि पहिल्या 10 षटकात 80 धावा केल्या. मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी विस्कळीत झाली. रोहित पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. त्याच्यावर धावा काढण्याची मोठी जबाबदारी होती, पण तो खराब शॉट खेळला आणि चार धावा करून बाद झाला. त्याला ऑफ स्टंपच्या चेंडूवर यष्टिरक्षक जोस इंग्लिशने झेलबाद केले. त्याने चार धावांचे योगदान दिले. तो सामन्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता.

World Cup 2023: फायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर

2. केएल राहुलची संथ फलंदाजी
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चांगली भागीदारी केली, मात्र कोहली 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीची विकेट पडल्यामुळे केएल राहुल अडचणीत आला. मधल्या षटकांमध्ये तो धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला आणि त्याची बॅट शांत राहिली. राहुलने 107 चेंडूत 61.68 च्या स्ट्राईक रेटने 66 धावा केल्या, ज्यात त्याने फक्त एक चौकार मारला. त्याने 107 चेंडू खेळले होते. त्याने आक्रमक फलंदाजी करायला हवी होती मात्र मिचेल स्टार्कने बाद केले.

3. रवींद्र जडेजा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये वाईटरित्या फ्लॉप झाला. त्याने 22 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. यानंतर गोलंदाजीतही तो लयीत दिसत नव्हता. त्याने 10 षटकात 43 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. दुसरीकडे, ट्रॅव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल या अर्धवेळ फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार गोलंदाजी केली.